उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग भारुडाचे वारी लोककलेची हा रंगतदार लोककलेवर आधारित कार्यक्रम दिनांक 23 रोजी आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ . प्रवीण स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, माजी आ . ज्ञानराज चौगुले,जिल्हा माहिती अधिकारी विकास खडसे, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, रोट. डॉ . दिपक पोफळे , शांतिदुत डॉ. उदय मोरे. सौ उषाताई रवींद्र गायकवाड ,सौ सुलक्षणाताई शिंदे , समाजसेवक बाबाभाई जाफरी. व्यापारी महासंघाचे सिद्रामप्पा चिंचोळे, नितीन होळे,यांची प्रमुख उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरवात नटराजाचे पुजन आणि दिप प्रज्वलित करुन करण्यात आली. या रंग भारुडाचे संगीतमय लोक कलावंतांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला . शाहिरी, पिंगळा, पोवाडा, वारकऱ्यांच्या कीर्तनासह आई अंबेचा जागर करत भारुडाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याची भूमिकन्या कृष्णाई प्रभाकर उळेकरने विविध सामाजिक प्रश्नावर बोट ठेवत मनोरंजन संगीतातून सामाजिक प्रबोधनाचा बहारदार आणि रंगतदार कार्यक्रम सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . आमदार प्रवीण स्वामी यांनी लोककलावंत म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या कृष्णाईला लक्षवेधक मुलाखत घेत तिला बोलत केलं .
शाहीर अभिजीत कदम, सुरेश विभुते, विक्रम शिंदे, अजित फोंडके ,भाऊकांत गोंधळी ,आण्णासाहेब उळेकर, निवेदक भैरवनाथ कानडे, प्रभाकर उळेकर, आदी कलावंतांसह बाल वारकरी मुलांनी सहभाग घेतला . यावेळी उमरगा शहरातील नागरिक ,महिला, विद्यार्थी व कलाप्रेमी प्रेक्षक उपस्थित होते.