धाराशिव (प्रतिनिधी)-हिंदवी स्वराज्य संस्थापक, स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धाराशिव शहरात सोमवारी (दि.17) विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
शिवजयंती सोहळ्यानिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवजयंतीनिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला. अभिवादन सोहळ्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दत्ता बंडगर, सोमनाथ गुरव, प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, रवि वाघमारे, गणेश खोचरे, बाळासाहेब काकडे, आतिश पाटील, प्रदीप मुंडे, तुषार निंबाळकर, पंकज पाटील, बंडू आदरकर, पांडु भोसले, हणमंत देवकते, रवि कोरे, नाना घाटगे, दिनेश बंडगर, निलेश साळुंके, अभिराज कदम, मंगेश काटे, सुरेश गवळी, मनोज उंबरे, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, गणेश आसलेकर, निलेश शिंदे, अजित बाकले, प्रताप शेंडगे, राज निकम, सागर शेरकर, गणेश राजेनिंबाळकर, मिलिंद पेठे, राकेश सूर्यवंशी, कालिदास शेरकर, शहाजी पवार, संजोग पवार, पिंटू आंबेकर, मनोज पडवळ, मुकेश चौगुले, संभाजी दळवी, यशवंत शहापालक, लाला पवार, बालाजी मगर, चेतन वाठवडे, सतीश लोंढे, विनोद केजकर, राज धज, बापू गायकवाड, चंद्रकांत पांढरे, राजेंद्र तुपे, राम माने, संदीप शिंदे, विठ्ठल शिंदे, मंगेश रंधवे, बंटी क्षीरसागर, कैलास सरकाळे, वैभव जाधव, अभिराज भोसले, सतीश ओहाळ, दादा गवळी बालाजी बीडबाग यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते.