भूम (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्थेच्या भूम शाखेचे उद्घाटन गुरुवार दि.3 एप्रिल रोजी जिल्हा प्रशाला भूम येथे होणार आहे. शाखा उद्घाटनाचे औचित्य साधून बालकुमार साहित्य संमेलन व पारितोषिक वितरण होणार आहे. शाखा उद्घाटन कार्यक्रम ह.भ.प.अरुण महाराज शाळू यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक, आदर्श मुख्याध्यापक तात्यासाहेब कांबळे हे राहणार आहेत. विलास पवार (सामाजिक कार्यकर्ते) बालसाहित्यिक आश्रुबा कोठावळे, श्री.एम.आय. मुजावर, कवयित्री संध्याराणी कोल्हे, आशा राऊत, बालकवी ऋतुराज कुकडे उपस्थित राहणार आहेत.वाचन संस्कृती रुजावी ,जिल्ह्यातून बालकुमार लेखक,वाचक वर्ग निर्माण व्हावा. दर्जेदार लेखनास बळकटी यावी. मोबाईलच्या आहारी जाणारी मुलं यांना वाचना साठी प्रवृत्त करणे.दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे कथाकथन ,कवी संमेलन, हस्ताक्षर स्पर्धा, घेऊन मुलांचा बौद्धिक, मानसिक, भावनिक , सामाजिक विकास करणे. बालकुमार साहित्य प्रकाशित करणे व लेखनास प्रेरणा देणे . त्यांच्या कलागुणांना वाव देणे. मुलांचे भाव विश्व समृद्ध करणे. इत्यादी उद्दिष्टासह मराठी बालकुमार शाखेचा शुभारंभ होत आहे हा उद्घाटन सोहळा अखिल भारतीय मराठी बालकुमार शाखा भूम व जनसेवा ग्रामीण विकास संस्था उळूप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.तरी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी ,वाचक यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शाखेच्या समन्वयक प्रा.अलका सपकाळ व शंकर खामकर यांनी केले आहे.