धाराशिव (प्रतिनिधी)- आज दि.31.03.2025 रोजी रमजान ईद (ईद उल फितर) निम्मीत धाराशिव जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदान मस्जीद येथे हजारो मुस्लीम बांधवांनी शांतेत नमाज पठाण केले. मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव हे धाराशिव ईदगाह मैदान येथे उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देवून ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या. सदर वेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती पुजार, जि.प.कार्यकारी अधिकारी मंयक घोष व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदान व मस्जीद येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

 
Top