तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबई येथील तस्कर संगीता गोळे हिचे बँक खाते गोठवण्यात (फ्रिज) आले असुन मुंबई येथून तीचे
बँक खाते सील करण्यासोबतच ड्रग्ज मधुन कमावलेले सोने, चारचाकी गाडी पोलिसांनी तपासात जप्त केली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज संबधित मंडळीचे धाबे चांगलेच दणाणुन गेले आहेत.
ड्रग्ज रँकेट प्रकरणी मुंबई येथील आकावर कठोर कारवाई होत असल्यामुळे स्थानिक आकांचे धाबे दणाणुन गेले आहेत. काहीनी मोबाईल,स्वीच आँफ केले आहेत. तर काही शहरातुन गायब झाले आहेत. स्थानिक आकांनी ड्रग्ज प्रकरणात दुसऱ्याच मोबाईल वापरले आहेत. त्यामुळे ते कायद्याचा फेरीत येण्यास वेळ लागत आहे. तर काहीनी राजकिय वजन वापरून कारवाई पासुन सुटका करुन घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संशियतीच्या संपूर्ण संपत्ती व बँक खात्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या रँकेट मध्ये मुंबई येथील गोळे कुंटुंब या धंद्यात असल्याचे वृत्त आहे. संगीता गोळे हिच्या खात्यावर कोट्यावधी रुपये सापडले असुन इतर बँक खात्याचा व तीचे कोणासोबत आर्थिक व्यवहार झाले याचा शोध सुरु आहे. संगीता व पिंटू बरोबरच स्थानिक आकाने ड्रग्ज विक्रीतून मोठी संपत्ती कमावली असल्याचे बोलले जात आहे. या ड्रग्ज मुळे काहीजण कर्जबाजारी झाले तर काही जण करोडपती झाले. पोलिसांनी याप्रकरणातील संशियतांची बँक खाते, संपत्तीचा व आर्थिक व्यवहाराचा शोध घेतल्यास निश्चित हे आका रँकेट मध्ये अडकतील अशी चर्चा आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथील अनेक लोकांची कुटुंब उध्वस्त झाले आहेत. मंञी अँड अशिष शेलार, पालकमंञी प्रतापराव सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील ड्रग्ज बाबतीत कठोर भूमिका घेण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत.