तुळजापूर  (प्रतिनिधी)-  येथिल, पुजारी नगर फाऊंडेशनच्या वतीने तुळजाई नगरीतील   भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षकाळ पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव म्हणून विविध क्षेत्रातील 75 महिलांचा सन्मान करण्यात आला.

शुभांगी गणेश पुजारी यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर उपस्थित सर्व महिलांसाठी धर्मवीर छावा चित्रपटाचा शो दाखवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा.स्मिता सुहास पेशवे, प्रमुख अतिथी म्हणून रोहिणी रामचंद्र रोचकरी,डॉ.सुप्रिया वडणे उपस्थित होत्या. कु.ईश्वरी गणेश पुजारी हिने इंग्रजी भाषेत आपले मनोगत व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सर्व सत्कार मूर्ती महिलांना शाल,गुलाब पुष्पांसह श्यामची आई या कादंबरी भेट देण्यात आली. पूजारी नगर फाउंडेशन सर्व पुरुष सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन तानाजी म्हेत्रे यांनी केले.

 
Top