परंडा (प्रतिनिधी )-आज सोमवार दि.17 मार्च रोजी ""छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ ब्रम्हगांव ता.परंडा"" या मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रम्हगांव या शाळेतील विद्यार्थ्यांना 20 लेझीम भेट देण्यात आले.

गावातील शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला.शिवजयंती उत्सव लोकवर्गणीतून मंडळाच्या वतीने शाळेसाठी हा सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण व्हावी म्हणून घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  फुलचंद ओव्हाळ, मंडळाचे पदाधिकारी किशोर खबाले, सुधिर जाधव ,उमेश हिंगणकर,पृथ्वीराज जाधव शाळेचे मुख्याध्यापक  लहु मासाळ, सहशिक्षिका श्रीम.सुषमा चव्हाण, श्रीम.अपेक्षा ओव्हाळ व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

 
Top