तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा येथे पीएमश्री योजनेअंतर्गत स्कूल ग्रीनरी करण्याकरिता लॉन हिरवळीची लागवड करण्यात आली.
शाळेतील परिसर सुंदर करण्यासाठी फूल झाडांची व हिरवळीची लागवड करण्यात आलेली आहे. शाळेत एकूण 2000 स्क्वेअर फिट हिरवळीची लागवड करून प्ले-ग्राउंड हिरवळ युक्त करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांकरिता शालेय परिसरात आनंददायी वातावरण निर्मितीसाठी खूप फायदा होणार आहे. यामुळे विद्यार्थी शाळेत राहतील आणि निसर्गरम्य वातावरणात शिकतील या निमित्ताने हिरवळीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी मुख्याध्यापक तय्शयबअली शहा आणि शिक्षकांनी परीश्रम घेतले.