कळंब (प्रतिनिधी)- मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकांच्या शाळेत इयत्ता 1 ली सह पुढील सर्व वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत तसेच 6 ते 14 वयोगटातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने “गुढी पाडवा प्रवेश वाढवा“ हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण यांनी दिली.

याबाबत दि. 12 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हास्तरीय बैठक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

दिवसेंदिवस जनन दर कमी होत चालला असून इयत्ता पाहिलीत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे तसेच कांही शाळाबाह्य होत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच इतर शाळेकडून होणारी पालकांची लूट थांबवण्यासाठी  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेत “गुढी पाडवा प्रवेश वाढवा अभियान राबवण्यात येणार आहे.

या अभियानात दि 17 मार्च रोजी  प्रत्येक गावात प्रभात फेरी काढून शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. 17  मार्च ते 29 मार्च प्रवेशपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करून दि 1 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळेत पालक व विद्यार्थी यांचा मेळावा घेऊन 1 एप्रिल पासून इयत्ता 1 लीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे.

या प्रवेश सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे श्री तांबारे यांनी सांगितले. या बैठकीसाठी बाळकृष्ण तांबारे यांच्या सह जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, सोमनाथ टकले भक्तराज दिवाने,सुधीर वाघमारे, अर्जुन गुंजाळ, धनंजय मुळे, प्रदीप म्हेत्रे, राहुल भंडारे, दत्तात्रय पवार, संतोष मोलवणे,संजीवन तांबे बालाजी माळी, सुनील सूर्यवंशी, हणमंत पडवळ, शेषेराव राठोड,सचिन राऊत,विजयकुमार ओवांडकर, प्रशांत घुटे,गोविंद जाधव, बालाजी पडवळ,कोंडीबा कारभारी, बापू काळे,दत्तात्रय गुंजाळ, दैवान पाटील, हरी पांचाळ अशोक डिकले, संघपाल सुकाळे विजयसिंह रणखांब, राजकुमार गुंजाळ सौदागर शेख, बाळासाहेब जमाले, धनंजय थोडसरे, प्रसाद मुंढे, विक्रम लोमटे विकास माळी अमर गोरे, विवेकानंद मिटकरी,उमेश काळे नितीन गायकवाड, प्रशांत गायकवाड, काशिनाथ सुरवसे शिवाजी चिखले, श्रीमंत चौरे, सुधाकर पांढरे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे व सूत्रसंचालन प्रदीप म्हेत्रे तर आभार विक्रम लोमटे यांनी मानले.


या बैठकीस शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित राहून प्राथमिक शिक्षक संघाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच या अभियानमुळे शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येतील याचा फायदा निश्चित होईल असे मत व्यक्त करून या अभियानात आम्ही सर्व शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी सक्रिय सहभाग घेऊ असे सांगितले. व या अभियानास शुभेच्छा दिल्या.

 
Top