कळंब (प्रतिनिधी)-मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या अमानुष हत्या करणारे आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी दि . ५  रोजी कळंब शहर कडकडीत बंद पाळण्यात आला . याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन पाठवण्यात आले . 

 सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले की, मस्साजोग तालुका केज येथील निरपराध सरपंच स्व संतोष अण्णा देशमुख यांची आरोपींनी अत्यंत क्रूर हत्या करून त्यांच्या देहाची मोठी विटंबना केलेली आहे ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब असून या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराड हे आहेतच . या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे .परंतु त्यांच्या पाठीशी राहणारे धनंजय मुंडे हे इतकेच या हत्तेसाठी जबाबदार आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे. यासाठी आज दि ५ मार्च रोजी  कळंब शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे. मयत संतोष अण्णा देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सकल मराठा समाज व इतर समाज बांधवांच्यावतीने या प्रमाणे मागण्या आहेत १. आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे २. गेली तीन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात अपयशी ठरलेले गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.३. या आरोपींना पाठीशी घालणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे . सदरील प्रकरणी आपण समाजाचा संताप लक्षात घेऊन उपरोक्त मागण्या तात्काळ मान्य करून यातील आरोपींना फाशीच शिक्षा देण्यात यावी अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल .यावेळी शहरात बँका शासकीय कार्यालय शाळा वगळून इतर सर्वत्र व्यापारी बाजारपेठ संपूर्णतः बंद ठेवण्यात आली होती यावेळी पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता . 

 
Top