कळंब (प्रतिनिधी)- येथील तहसील कार्यालयाच्या आवारात दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी दस्तलेखक यांनी आपली दुकाने या तहसील कार्यालयाच्या आवारात थाटली होती . गेली अनेक वर्ष च्या कालावधीत ही दुकाने आहे त्या जागी ठेवून तेथील दस्तलेखक हे नागरिकांचे कामे करीत होती पण या दस्तलेखा मधील आपापसातील वाद विकोपाला गेला अन हेवेदावे वाढले आणि त्याचे रूपांतर थेट अतिक्रमण हटाव मोहिमेतच झाले. शेवटी तक्रारीचा पाढा तहसीलदार यांच्याकडे गेला आणि शेवटी मंगळवार दि . 4 मार्च रोजी तहसीलदार यांनी खुद्द स्वतः उभा राहून सर्व अतिक्रमण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने हटवली यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसांड झाली आहे . ज्या अतिक्रणाचा सर्वसामान्यांना काहीच त्रास होत नसल्याने हे ही हटवली मात्र वाहतुकीला अडथळा करणारे अतिक्रमण मात्र जैसे तेच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे तर सर्व सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी महसूल प्रशासनाने मुद्रांक विक्रेता स्टॅम्प तिकीट विक्रेता यांना हक्काची जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे व त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना तिकीट आणि स्टॅम्प एकाच ठिकाणी मिळतील अशी व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरत आहेत .