परंडा (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केलेल्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व संबधित आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही मोक्का कायद्यांतर्गत सहआरोपी करून गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी बुधवार ( दि .५ ) परंडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन बहुजन समाज बांधव व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देण्यात आले . दिलेल्या बंदच्या हकेला उत्सफूर्त प्रतिसाद देत परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता .