धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांचा सत्कार मतदार जनजागरण समिती व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक आणि शाही टोपी, पुष्प बुके, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
नुकतेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला याबाबत अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली, मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती, रुग्ण कल्याण समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या रुग्ण व त्यांचे नातलगासाठी पाणी दानाचा उपक्रम, रक्तदानासाठी पुढाकार व रक्तदाते यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार व इतर राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत चर्चा झाली. पर्यटन संदर्भात देखील चर्चा झाली. गणेश वाघमारे यांनी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती व मतदार जनजागरण समितीच्या कार्याची व आलेल्या सर्व पदाधिकारी यांची ओळख करून दिली, साहेबांनी झालेल्या सर्व चर्चांमध्ये सकारात्मकता दाखविली.यावेळी अब्दुल लतिफ,संपतराव शिंदे,गणेश वाघमारे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,शेख रौफ,प्रविण जगताप,बाबासाहेब गुळीग,युसुफ सय्यद,गोविंद वारे,शशी माने,स्वराज जानराव,विशाल सरवदे,अतुल गायकवाड,राहुल राऊत सह मतदार जनजागरण समिती व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.