परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांनी दिल्ली येथील 98 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रतिनिधीत्व केले होता यांचा सार्थ अभिमान बाळगत परंडा तज्ञ विधीज्ञ मंडळाने त्यांचा सन्मान केला.
यावेळी विधिज्ञ महासंघाचे सर्व पदाधिकारी व वकिल संघाचे सर्व सदस्य हजर होते.यावेळी तुकाराम गंगावणे यांनी मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा जागर दिल्लीत कसा सन्मान झाला याबद्दल सखोल विवेचन केले. गंगावणे यांनी मांडलेल्या विचाराला वकिल संघटनेच्या सर्व सदस्यानी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले. तसेच साहित्यिक गंगावणे यांचे सर्व स्थारातून सन्मान व कौतुक होत आहे.