धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि, या कारखान्यात 54 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचीत्य साधुन 6 मार्च रोजी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे टाईम किपर दिपक जाधव यांनी सर्व प्रथम उपस्थित कर्मचारी, कामगार यांना सुरक्षिततेची शपथ दिली. त्यानंतर सुरक्षा व इंजि. विभागातील कर्मचायांनी वापरण्यात येत असलेल्या सुरक्षिततेच्या साधनांचा प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे म्हणाले, आपली सुरक्षा हिच कुटूंबाची सुरक्षा यामुळे सर्व कामगार व अधिकारी यांनी कारखान्यात काम करीत असताना अपघात होवू नये याची दक्षता घेवून हेल्मेट, सेफ्टी बुट, सेफ्टी बुट यासह आवश्यक त्या सेफ्टी साधनाचा वापर करावा. कर्मचायांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन विना अपघात काम केल्यास कामगारांची, कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते. तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन केले. सुरक्षा सप्ताह कार्यक्रमासाठी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top