तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीराकडे येणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यांन पैकी दोन रस्त्यावर  भाविकांन साठी विविध सुविधा उपलब्ध करुन आहेत माञ शुक्रवार पेठ  ते मंदीर यारस्तावर  दिल्या नसल्याने भाविकांसाठी ई रीक्षा व थेट प्रेक्षेपण एल.ऐ.डी स्क्रीन, रोडवरील मॅट, छत तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान  अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी यांनानिवेदनदेवुन केली आहे

 शुक्रवार पेठ ,पावणारा गणपती मार्गे खडकाळ गल्ली अधिकृत गेट जवळ साळुंके गल्ली, भोसले गल्ली, खडकाळ गल्ली, मंकावती गल्ली हा भाग पुजारी बहुल भाग आसून या भागात येणाऱ्या भाविकांसाठी अद्याप पर्यंत ई रीक्षा व थेट प्रेक्षेपन एल.ए.डी स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आलेली नाही य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहेत.या रस्ता कडे वाहतुक  शाखा पोलिस फिरकत नाहीत. 

तरी जिल्हाधिकारीनी  चैत्र पोर्णिमे पुर्वी   रोडवर मॅट व छत आणि पिण्याच्या पाण्याची जागोजागी व्यवस्था तात्काळ करावी,* तसेच मंदीर ते भवानी रोड वरील गेट पर्यंत मंदीर स्वच्छता कर्मचाऱ्यामार्फत ज्या प्रकारे स्वच्छता करण्यात येते त्याच प्रकारे येथे  स्वच्छता दररोज करण्यात यावी असे निवेदन दिले यावरस इंद्रजीत साळुंके,बाळासाहेब भोसले,नागनाथ भिसे,रुद्र साळुंके,विक्रम माडजे यांच्या साक्षरी आहेत. 

 
Top