तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी आज सकाळी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन चालू असलेल्या जीर्णोद्धार कामांची पाहणी केली.

मंदिर परिसरातील कामांसोबत तुळजाभवानी मातेचा गाभारा, भवानी शंकर गाभारा, आदिमाया आदिशक्ती मातंगी देवीकडील परिसराची पाहणी करून चालू असलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी घाटशीळ परिसर, रामदरा, 108 भक्तनिवास इत्यादी ठिकाणांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे, स्थापत्य विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक राजकुमार भोसले, सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, सहाय्यक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम, अनंत कोंडे व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top