धाराशिव (प्रतिनिधी)- दिल्ली येथे पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मधील खुल्या कवी संमेलनात आणि पुणे येथे पार पडलेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात भाग घेऊन धाराशिवचे नाव उंचावणा-या कवींचा धाराशिव जिल्ह्यातील बालकुमार साहित्य संस्था, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, आणि अक्षर मानव या साहित्य संस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. जेष्ठ बालरोग तज्ञ तथा सामाजिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर अभय शहापूरकर यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी संमेलनात भाग घेतलेले रवींद्र शिंदे, तु.दा.गंगावणे, एडवोकेट जयश्री तेरकर, मीना महामुनी, समाधान शिकेतोड, अश्विनी घाट, यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक युवराज नळे राजेंद्र अत्रे भागवत घेवारे सुषमा सांगळे सुरेश शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.