तुळजापूर (प्रतिनिधी)-  गुरुवार दिनांक 13 मार्च, हुताशनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान येथे होलिकादहन पार पडले. श्री तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडा समोर मोठ्या उत्साहात होळीचे पूजन आणि दहन करण्यात आले.

प्रथा परंपरेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिरातील होळी पूजनानंतरच तुळजापूर शहरातील घरोघरी होळी चे पूजन केले जाते. हुताशनी पौर्णिमेनिमित आज देवीचा छबिना काढण्याऐवजी होळी साजरी करण्यात येऊन जोगवा मागण्यात आला.  होळी सणाच्या निमित्ताने आज सायंकाळच्या अभिषेक पूजेची घाट 6 वाजता झाली. रात्री 8.30 वाजता आरती, धुपारती करण्यात आली. 

परंपरेनुसार मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे, पुजारी सुहास कदम, महंत हमरोजीबुवा, वाकोजीबुवा यांच्या हस्ते होलिकापूजन व दहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले आणि अन्य मंदिर कर्मचारी व पुजारी उपस्थित होते.

होळीतील रक्षा मंदिरास द्या - महंत तुकोजीबुवा

हुताशनी पौर्णिमा (होळी) केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी रक्षा (राख) आपण टाकून देतो ती रक्षा टाकून न देता किंवा वाया न घालवता श्री तुळजाभवानी मंदिरात देवीची धूपआरती झाल्यानंतर देवीचा अंगारा निघतो त्यासाठी ती पवित्र रक्षा लागणार आहे. तरी आपणकडून ती रक्षा (राख) मंदिरात देण्यात यावी. असे आवाहन महंत तुकोजी बुवा यांनी केले आहे. या पवित्र रक्षा (राखेचा) योग्य उपयोग होईल. असे आवाहन महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी केले आहे.

 
Top