कळंब (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यातून देखील आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे प्रयोग राबविले जात असून, अशा कृषी प्रदर्शनातून निश्चितपणे शेतकरी अद्यावत व आधुनिक होण्यासाठी मदत होईल. या पुढील काळातही असे कृषी प्रदर्शन आयोजित केली जावेत. असे मत धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. 

फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशन आयोजित किसान मित्र कृषी प्रदर्शन 2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते स्वागत अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कवडे हे होते. तर नॅचरल शुगरचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड, इनरव्हीलच्या अध्यक्षा प्रतिभाताई भवर, तालुका कृषी अधिकारी सरडे प्रदीप मेटे, सागर बाराते पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज चव्हाण, विश्वजीत जाधव आलोक मिश्रा आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, सातत्याने प्रयोगशील शेती म्हटल्यानंतर बारामतीच्या आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र बारामती देखील आपल्यासारखं दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. बारामती मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेथील शेतीचा कायापालट झाला. अगदी त्या पद्धतीने आपण आपल्या भागाची मागास म्हणून असणारी ओळख पुसून टाकली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी व फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशनने पुढाकार घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.          

यावेळी कृषी भूषण पांडुरंग आव्हाड म्हणाले की, यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती व तरकारीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वृद्धी होते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अंगीकार करावा. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी तीर्थकर व प्रा. जगदीश गवळी यांनी केले. तर प्रस्ताविक भारत पारवे यांनी तर आभार अमोल उबाळे यांनी मानले. या कृषी प्रदर्शनाची सुरुवात सकाळी शहरभर शोभायात्रा काढून करण्यात आली. बैलगाडी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील विद्यार्थी पारंपारिक वाद्य याचा समावेश होता. स्टॉल पाण्यासाठी शेतकरी व ग्राहकांची दुपारी गर्दी झाली होती.  अश्वप्रदर्शनासाठी 50 हून अधिक घोडे सहभागी झाले होते. विजेत्याना सन्मानपत्र बहाल करण्यात आले.

 
Top