कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव ते छ संभाजी नगर व्हाया बीड रेल्वे मार्गावर कळंब रेल्वे स्थानक करणे आणि कळंब रोड ( तडवळे कसबे) येथे सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्या बाबत कळंब रेल्वे कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक राज्याचे प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉ आदीत्य  पतकराव ( पुणे ) यांना अंबाजोगाई येथे भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ रामकृष्ण लोंढे व डॉ अमीत पाटील यांनी सदरील रेल्वे मार्ग कळंब करांच्या सोईच्या दृष्टीने आखण्यात यावा. तसेच कळंब रोड येथे लातूर- मुंबई सह ईतर सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. डॉ पतकराव यांनी दोन्ही ही गोष्टी व्यवस्थित ऐकून घेतल्या व त्यावर सकारात्मक अहवाल देण्याचे आश्वासन दिले.

 
Top