कळंब (प्रतिनिधी)- 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी (प्रा) अशोक पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पाटील, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. बाळकृष्ण तांबारे , गट शिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,विस्तार अधिकारी सुशील फुलारी, प्रभारी उपशिक्षणाधिकारी संतोष माळी, विस्तार अधिकारी जंगम साहेब, शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर जगदाळे यांच्या हस्ते कु. वैष्णवी प्रदिप यादव, अक्षरा वैभव तोडकर, श्रेया पांडुरंग धुमाळ व समर्थ अशोक तोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव च्या वतीने जिल्हाभर राबवत असलेल्या "गुढी पाडवा प्रवेश वाढवा" आहे अभियान अंतर्गत पहिलीच्या विद्यार्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दि. ५ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने निर्णयातील तरतुदी प्रमाणे पहिली व दुसरी विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले. शासन निर्णयात अपेक्षित क्षमता प्राप्त शाळा असल्याने प्रगत शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसेगांव के स्वयंघोषित करण्यात आले. याप्रसंगी शाळेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या भोजन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की सर्व सोयींनी युक्त अशी हसेगावची शाळा आहे . यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास झाला आहे. जिल्ह्याच्या या टीमने शाळेच्या परिसराची पाहणी केली या वेळी परसबाग , विद्यार्थांच्या जेवणाची व्यवस्था,क्रीडांगण इ.सर्व भौतिक सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती प्रशांत घुटे यांनी दिली . नवोदय पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे राजाभाऊ गुंजाळ, प्रशांत घुटे,श्रीमती लक्ष्मी कोकाटे शिवराज मेनकुदळे, विकास खारके, श्रीमती उषा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.तर गुणवत्तापूर्ण वर्ग म्हणून श्रीमती प्रतिभा बिडवे, श्रीमती ज्योती ढेपे, श्रीमती सविता मेटे,श्रीमती विद्या मनगिरे यांचाही भाऊसाहेब यादव यांनी सत्कार केला.कार्यक्रम प्रसंगी स्काऊट गाईड पथकाने केलेले संचलन व लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रशांत घुटे तर आभार राजाभाऊ गुंजाळ यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामसेवक विजय लांडगे, तलाठी सोनवणे, मंडळ अधिकारी , रमेश शिंदे सर गावातील नागरिक शाम मंडळ , लालासाहेब यादव ,अशोक तोडकर ,वैभव तोडकर,श्रीकांत धुमाळ ,प्रदिप यादव,ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.