तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा जोडो अभियान घेऊन निघालेली राजमाता जिजाऊ रथयात्रा बुधवार दि. 26 मार्च रोजी  दुपारी एक वाजता छञपती शिवाजी महाराज  पुतळ्या जवळ आगमन होताच या रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.  त्यानंतर छत्रपती छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ही रथयात्रा दिपक चौक, भवानी रोड मार्ग श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात गेली. याञेतील सहभागी मान्यवरांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर  राजेशहाजी महाव्दार समोर जिजाऊ वंदना घेण्यात आली.

शहाजी महाराज यांच्या जयंती दिनी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर आणि मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली या याञेतील सहभागी  मंडळीचे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा, स्वराज्य संघटना मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. योवळी जिल्हाध्यक्ष शरद पवार, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके, स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, धर्यशिल आबा कापसे, प्रशांत अपराध, औदुंबर जमदाडे, सत्यजित साठे, कुमार टोले, प्रशांत इंगळे सह  मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.


 
Top