तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठवाड्यातील सर्व प्रथम बैल गाडा शर्यत घेणारे शिवबाराजे प्रतिष्ठाण वतीने शुक्रवार दि. 28 मार्च रोजी धाराशिव रोड बोरी भारत आडेकर यांच्या शेतात मराठवाडा केसरी श्रीतुळजाभवानी चषक भव्य बैलगाडा स्पर्धचा थरार रंगणार आहे. या स्पर्धसाठी जवळपास 150 बैलजोडा स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. यात बारामती, फलटण, पंढरपूर, वैराग, अकलुज सह मराठवाड्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.
या बैलगाडी स्पर्धतील प्रथम विजेत्या संघास रोख 51 हजार रुपये व मराठवाडा केसरी श्री तुळजाभवानी चषक आमदार कैलास पाटील यांच्या वतीने देण्यात येवुन गौरविण्यात येणार आहे. तसेच व्दितीय विजेत्या संघास 31 हजार, तृतीय क्रमांक 21 हजार रुपये चषक, चतुर्थे 11 हजार रुपये, पाचवा क्रमांक 7 हजार, सहावा क्रमांक 5 हजार रुपये या स्पर्धसाठी नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन घेतली गेली आहे.
या स्पर्धसाठी महंत तुकोजी बुवा, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील सह अनेकांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी अर्जुन साळुंके, विकी वाघमारे, चेतन शिंदे, दीपक निकम सह त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.