धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपींपैकी चार आरोपींचे नावे जाहीर केल्यामुळे तुळजापूरमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती ठाकरे गट शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल खपले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाम पवार, सुनिल जाधव, हनुमंत साळुंके आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना राहुल खपले यांनी काही माध्यमांनी खासदार यांचे कार्यकर्ते असल्याची बातमी चालवली. परंतु हे चुकीचे आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे मान्यवर नेत्यांसोबत फोटो आहेत. यांचा अर्थ त्यांचे कार्यकर्ते आहेत असा होत नाही. परंतु तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ज्या आरोपींची नावे जाहीर झाली आहेत त्या आरोपींचा गेल्या 10 वर्षापासून कोणत्या नेत्यासोबत आहेत हे पाहिल्यास या प्रकरणाशी कोणत्या नेत्यांचा संबंध आहे हे लक्षात येते. असे सांगून राहुल खपले यांनी नगर परिषद तुळजापूर, तुळजाभवानी मंदिर समितीला पुरवण्यात आलेली सुरक्षा रक्षक कोणत्या कंपनीचे आहेत. ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे? नगर परिषद कोणाच्या ताब्यात होती? असा प्रश्न उपस्थिती  करून राहुल खपले यांनी यातून कमवलेल्या पैसा कमी पडत होता का? त्यामुळेच ड्रग्जचा व्यवसाय चालू केला का? असाही प्रश्न उपस्थित करून या आरोपींना मोक्का लावा अशी मागणी खपले यांनी केली. 


तुळजापूरची बदनामी 

गेल्या दोन-तीन वर्षापासून ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूरची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. काही गावच्या ग्रामपंचायतींनी तर ठराव घेवून तुळजापूरला मुलगी द्यायची नाही असे ठरवले आहे. त्यामुळे तुळजापूरवाल्यांशी सोयरीक ही कोणी जमवत नाही. अशी खंत राहुल खपले यांनी व्यक्त केली. 

 
Top