धाराशिव (प्रतिनिधी)- दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयीक गुन्हे उघडकीस आणणे कामी रात्र गस्त पेट्रोलिंग करत असताना पथकास ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्या जवळील जुना पळसप रोड तेरणा माध्यमिक प्रशालाच्या बोर्डाच्या जवळ आले. रोडचे कडेला अंधारामध्ये पाच इसम दिसुन आले. पथकास संशय आल्याने जवळ जावून पाहणी केली असता दोनजण अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकलसह पळून गेले व इतर 03 जण मोटरसायकलवर पळून जात असताना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी व पाहणी केली असता नमुद इसमा जवळ दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आल्याने सदर इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे विचारले असता संतोष प्रभाकर कुराडे, वय 36 वर्ष, रा सुभाष नगर अंकलखोप ता. पलूस जि. सांगली, अविनाश प्रभाकर कुराडे, वय 34 वर्षे, सुभाष नगर अंकलखोप ता. पलूस जिल्हा सांगली, प्रवीण राजाराम मोरे, वय 30 वर्ष, रा. चांदोल वसाहत, आष्टा ता. वाळवा जिल्हा सांगली अशी नावे सांगितली. तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांचे कडे दरोड्याचे साहित्य कत्ती, कटावणी, कटर अंदाजे किंमत 600, 3 मोबाईल एकुण किमंत 30 हजार रूपये, गुन्ह्यात  वापरलेले मोटरसायकल अंदाजे किंमत 60 हजार रूपये असा एकूण 90 हजार 700 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. मिळून आलेल्या नमूद इसमांचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्यांच्यावर धाराशिव तसेच सांगली जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली. यावरून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.

 
Top