भूम (प्रतिनिधी)- मांतग समाजातील तानाजी सोनकांबळे रा. उदगीर यांची निर्घृण हत्या व परभणी येथील आपल्या समाजातील 10 वर्षीच्या चिमकूलीवर झालेला पाशवी बलात्कार या दोन्ही प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई व कठोर शिक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम यांच्या मार्फत सकल मांतग समाज भुमच्या वतीने निवेदन देण्यात आले. या दोन प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना सहआरोपी करा, हे दोन्ही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा व समाजात असे पुन्हा होऊ नये याकरिता संबधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. सदरील प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास सकल मांतग समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र भर आंदोलन उभा करुन या गुन्ह्य़ातील आरोपींना जशाच तसे उत्तर देईल. अशा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनावर प्रदीप साठे, रोहित गायकवाड, राजु साठे, शैलेश साठे, अकाश साठे, सचिन साठे, योगेश साठे, विनोद दुबळे, सुमित साठे, ओम साठे आदिची स्वाक्षरी आहे.