तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरीषद वाहनतळ वसुली कंञाट 8 फेब्रुवारी 2025 रोजी संपला असुन सध्या नगरपरीषद वाहनतळ वसुली करीत असल्याने यात पारदर्शकता आणावी अशी मागणी शहरवासियांमधुन केली जात आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील वाहनतळ वसुली हा विषय सोन्याची अंडा देणारी कोंबडी असल्याचे बोलले जाते. सध्या नगरपरीषदने वाहनतळ वसुली बुके छापले असुन या पावती बुकावर असणारी सही कुणाची एकदम कोबडा मारल्या सारखी साधी सही कशी अशा साधा सहीमुळे डुप्लीकेट पावती बुक माध्यमातून वसुली करता येवु शकते. तसेच नगरपरीषदने अनेक कामगार वाहनतळ पावती वसुलीसाठी ठेवले आहेत. या कर्मचांऱ्यात अनाधिकृत कर्मचारी असल्याचे चर्चा आहे.
सध्या वाहनतळ पावती वसुली रक्कम कमी येत असल्याचे समजते. यात काही डुप्लीकेट वाहनतळ पावती बुक असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापुर्वी ही वाहनतळ वसुली नगरपरीषद मार्फत होत होती. त्याकाळात ही कलेक्शन बाबतीत संशयाचे वातावरण होते आहे. आता प्रशासक काळ आहे. लोकप्रतिनिधी संबध नाही वाहनतळ वसुली बाबतीत मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरी असलेले पावतीबुक वसुलीसाठी वापरावे. वाहनतळ ठेका वर्षासाठी तीन कोटी रुपयेला गेला होता. म्हणजे दिवसाला 27000रुपये कलेक्शन व्हावे लागते. सध्या सुगी, परिक्षा मोसम असल्याने भाविकांची संख्या कमी आहे. तरीही शहरात दोन हजार आसपास येतात म्हणजे लाखाभर रुपये सहज कलेक्शन होते. सध्या नगरपरीषद शुल्क पोटी पन्नास रुपये वसुली केली जाते माञ कुठलीही सुरक्षावाहनाला पुरवली जात नाही सध्या अनेक अनाधिकृत वाहनतळे शहरात कार्यरत असुन याकडे नगरपरीषदची अर्थपुर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. वाहनतळ वसुली विभागात येण्यासाठी कर्मचारी मोठ्या संखेने इछुक असतात या मागे काय गुढ हे शहर वासियांना उलगड ? नसल्याचे समजते.