धाराशिव (प्रतिनिधी)- दि.3 मार्च ते दि.10 मार्च जागतिक श्रवण दिन सप्ताह साजरा केला जातो,सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कर्ण बधिरता प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे राबविण्यात आला. यात कर्ण बधिरता प्रतिबंधक व नियंत्रणाच्या जनजागृतीसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. 

या रॅलीची सुरुवात अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चव्हाण व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते हिरवा झेडा दाखवुन करण्यात आली. रुग्ण कल्याण समिती सदस्य एम डी देशमुख, अब्दुल लतिफ, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती व इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी लाकाळ, सिईओ संजय मगर, डॉ.नानासाहेब गोसावी, डॉ.नितिन भोसले, डॉ.महेश कानडे, डॉ.डुमने, डॉ.विक्रांत राठोड, डॉ.क्षितिजा बनसोडे, सिध्दार्थ जानराव, मेट्रन संगिता फड, सुमित्रा गोरे सह अन्य उपस्थित होते. कान, नाक, घसा तज्ञ डॉ.सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. तर जागतिक महिला दिनानिमित्त महिला डॉक्टर सिस्टर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन परिचारिका सुवर्णा देशमुख यांनी केले.


 
Top