धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात खिरणी मळा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करत चार कत्तलखाने जेसीबीने जमीनदोस्त केले.
धाराशिव जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंशीय जनावरांची निर्दयपणे अवैध वाहतुक, गोमांस वाहतुक, प्राण्यांची छळवणुक, तसेच गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी अवैध पणे उभारण्यात आलेले कत्तल खाने याबाबत धाराशिव जिल्ह्यात सन 2024 व 2025 मध्ये एकुण 106 गुन्हे दाखल आहेत. धाराशिव शहर हद्दीतील खिरणीमळा,नागनाथ रोड, स्मशानभुमीच्या आलीकडे भोगावती नदीलगत गो माफीया यांनी अनाधिकृतरित्या उभे केलेले कत्तलखान्याची माहिती मिळाल्याने पोलीस विभाग धाराशिव व नगर परिषद धाराशिव यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून पुर्ण पणे निष्कासन करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शाफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि रविंद्री अंभोरे, पोलीस उप निरीक्षक संदिप ओहोळ, अक्षय डिघोळे व पोलीस अंमलदार यांचेसह धाराशिव नगर परिषदचे मुख्याधिकारी वसुधा फड, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.