तुळजापूर (प्रतिनिधी)  - येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी  सांयकाळी पाच ते आठ  श्रीतुळजाभवानी मंदीर समोर  समस्त तुळजापूरकरांचा  वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना लागेल तेव्हा स्वता आई, वडील, पती, पत्नी, मुले यांना मोफत रक्तपुरवठा करण्यात येणार आहे. सर्व शासकिय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्यास एक दिवस जादा रजा मिळणार आहे. तरी रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन शहरवासियांनी केले आहे.

 
Top