तुळजापूर (प्रतिनिधी)- येथे मंगळवारी भरणा-या आठवडा बाजारात चो-यांचे प्रमाण वाढले होते व बाजारात शिस्तीचे वातावरण नसल्याच्या पार्श्वभूमीवर आज आठवडा बाजारात होमगार्ड  पोलिस व नगरपरीषद कर्मचारी तैनात केल्याने या उपाययोजनेचे व्यापारी व बाजारकरुनी स्वागत केले.

मंगळवारी भरणा-या  आठवड्या बाजारात बाजारकरुंचे  मोबाईल पैसे दुचाकी वाहने  चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच काही विक्रेते बाजारकट्टे परिसरात बसण्या ऐवजी शुक्रवार पेठकडे, हाडको मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसत असल्याने येथे वाहतुक कोंडी निर्माण होवुन याचा ञास भाविकांना होत होता. अखेर मंगळवार दि. 11 मार्चपासुन सहा होमगार्ड पोलिस व आठ नगरपरीषद कर्मचारी दिवसभर बाजारात फिरुन बाजाराला शिस्त लावली. पोलिस तैनातमुळे चोरांचा बंदोबस्त झाल्याने बाजारकरु व व्यापारी वर्गाने या बद्दल समाधान व्यक्त करुन होमगार्ड पोलिस व नगरपरीषद चे आभार मानले.

 
Top