धाराशिव (प्रतिनिधी)- येथील कु.सक्षणा सलगर यांची राष्ट्रीय अध्यक्ष, युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे प्रा. बालाजी आगळे, प्रा. अरुणा पोटे, प्रा. रवी पोवळे, प्रा.अभिमन्यू गायकवाड, प्रा. सूर्यकांत जोगदंड यांच्याकडून भव्य सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रा.डॉ.लोंढे म्हणाले की, कुमारी सक्षणा सलगर यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी जिल्हा परिषदेवर काम करताना अनेक योजनांचा लाभ गोरगरिबापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील युतीच्या समस्या आणि करिअर बाबत अनेक कार्यशाळा घेऊन विविध अधिकाऱ्यांच्या माध्यमातून युवक व युतींना मार्गदर्शन देखील केलेले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी आणि प्राध्यापक उपस्थित होते.