धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकार सुधीर पवार, मच्छिंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांना रंग लावून पत्रकारांच्या रंगोत्सवाला सुरूवात करण्यात आली. विशेष म्हणजे या रंगोत्सवात नैसर्गिक रंग वापरण्यात आले आहेत.
होळीनंतर पाच दिवसाने धाराशिव जिल्ह्यात रंग पंचमी असते. बुधवार दि. 19 मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून बच्चे कंपनीने रंगोत्सवाला सुरूवात केली. धाराशिव शहरातही रंगोत्सवामुळे बाजार पेठे बंद होती. तर शाळा, महाविद्यालय यांना रंगपंचमीमुळे सुट्टी देण्यात आली होती. शासकीय कार्यालय नेहमी प्रमाणे चालू असले तरी लोकांची गर्दी नव्हती. विविध क्षेत्रातील लोकांनी रंगपंचमी साजरी केली. पत्रकार सुधीर पवार, मच्छिद्र कदम, आकाश नरोटे, जी. बी. राजपूत, काकासाहेब कांबळे या पत्रकारांनी पत्रकारांचा रंगोत्सव सुरू केला. जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांना रंग लावून रंगोत्सव सुरू केला.