कळंब (प्रतिनिधी)- रशियाच्या काझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रुती रुपेश कवडे हिने सहभाग घेऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली.

कळंब येथील कुमारी ज्यामध्ये विविध देश आणि राज्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महोत्सवाची थीम देशभक्तीपर होती. भारतीय विद्यार्थ्यांच्या नृत्य गटाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे पुढे  नृत्य सादर केले. या गटात भारतातील विविध राज्यांतील 13 जणांनी आपली महाराष्ट्रीय संस्कृती जगासमोर आणली. सहभागींमध्ये श्रुती रूपेश कवाडे (महाराष्ट्र) होती. ज्यांनी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि मराठी संस्कृतीची कल्पना पुढे नेली. जिशांत कुमार (तामिळनाडू) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.  छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम आणि भक्ती यामुळे मुलां नी उस्फुर्त परी काम केले. कळंब येथील श्रुती रुपेश कवडे हिने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top