धाराशिव (प्रतिनिधी)-  उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 19 मार्च रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दृरदश्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हयातील औद्योगिक क्षेत्राचा आढावा घेतला. 

यावेळी त्यांच्या दालनात आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील व प्रवीण स्वामी उपस्थित  होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,जिल्हा उद्योग केद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता आडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी खाडे,सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,औद्योगिक असेाशिएशनचे अध्यक्ष प्रवीण काळे व त्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ना. सामंत यावेळी म्हणाले की,जिल्हयात उद्योगाला चालना देण्यासाठी औद्योगीक क्षेत्रात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दयाव्यात.औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेली जमीन संपादीत करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी.ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी उद्योग उभे राहतील व त्या उद्योगामधून रोजगार निर्मितीला चालना दयावी.त्यामुळे रोजगारानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होईल.औद्योगिक असोशिएशनच्या ज्या अडीअडचणी आहेत,त्या सोडविण्यात येतील.विविध विभागांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या जबाबदाऱ्या वेळीच पार पाडाव्या,असे श्री.सावंत यावेळी म्हणाले. वाशी औद्योगिक वसाहतीत फटाका उद्योगाला जागा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. सावंत पुढे म्हणाले, जिल्हयातील वडगांव,उमरगा,लोहारा,वाशी,तामलवाडी,कौडगावसह अन्य ठिकाणी असलेल्या औद्योगिक क्षेत्राचा विकासाच्या दृष्टीने सहकार्य करण्यात येईल. 

 
Top