कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरूळ येथे (दि 01 मार्च 2025) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी त्या विद्यार्थ्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक स्टॉल मांडले होते. यात विविध भाजीपाला, खाद्यपदार्थ नाश्त्याचे पदार्थ असे विविध प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडले होते याचे उद्घाटन अभय वार्ताचे संपादक जयनारायण दरक व किरण रितापुरे यांच्या हस्ते सदरील बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी गावातील उपसरपंच समाधान कानाडे व तानाजी (काका) जाधव, कपिल रितापुरे , अमृत जाधव, अभिजीत झाडके, आनंद जाधव, उत्तरेश्वर तौर, सचिन गायकवाड, किरण भोसले,प्रशांत वायकर, निखिल रितापुरे ,नामदेव भराडे तसेच ग्रामस्थ शिक्षणप्रेमी व पालक वर्ग बहुसंख्येने हजर होते. सदरील सदरील मेळाव्यात विद्यार्थ्यांना बाजारहाट ही संकल्पना समजावी त्याचबरोबर व्यवहारिक गणित ,दैनंदिन जीवनातील व्यवहार , नफा -तोटा संकल्पना तसेच भविष्यातील उद्योजकता याची ओळख व्हावी या उद्देशाने सदरील बाल आनंद मेळावा आयोजित केला होता. या बाल आनंद मेळाव्यात गावातील सर्व ग्रामस्थ ,शिक्षणप्रेमी ,सामाजिक राजकीय क्षेत्रातील पालक डिजिटल मीडिया , पत्रकार बंधू सर्व विभागातील ग्रामस्थ व माता पालक भगिनींनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला.
बाल आनंद मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले