कळंब (प्रतिनिधी)- फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशनच्या वतीने कळंब शहरात कृषी प्रदर्शनामध्ये एक विशेष डॉग प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात विविध प्रजातींच्या कुत्र्यांचा समावेश होता, ज्यामध्ये शुद्ध जातीच्या कुत्र्यांचा आणि सामान्य प्रजातींच्या कुत्र्यांचा समावेश करण्यात आला होता.

प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शहरातील प्राणी प्रेमींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात भाग घेतला. विविध प्रजातींच्या कुत्र्यांना सुंदरतेसाठी, चांगल्या शारीरिक रचनेसाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेसाठी पुरस्कार देण्यात आले.

या प्रदर्शनात विविध देशांनी विदेशी प्रजातीची दाखल झाले होते. यात रॉटविलर डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, लेब्रा डॉल, हासी,कारवान पाकिस्तानी बुले अशा विविध जातीचे श्वान यात सहभागी झाले होते.स्पर्धेतील एकूण 80 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. भर उन्हामध्ये क्षणप्रेमींनी अक्षरशा लहान मूलबाळासह श्वान  प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.उन्हामध्ये उन्हामध्ये कळमकर आणि शेतकरी बांधवांनी श्वान प्रदर्शनाला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे परीक्षण डॉ प्रीतम आचार्य अंबाजोगाई व डॉ सावजी सर परळी यांनी पाहिले .या यशस्वीतेसाठी श्वानतज्ञ डॉ . नेताजी शिंगटे, सागर भडंगे यांनी परिश्रम घेतले. या प्रदर्शनाचे उद्दीष्ट प्राणी प्रेमी समुदायाला एकत्र आणणे आणि कुत्र्यांच्या योग्य देखभालीबद्दल जनजागृती करणे हे होते. या संपूर्ण श्वान प्रदर्शनासाठी फ्रेंड्स फॉरएवर फाउंडेशनने पुढाकार घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला.

 
Top