केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या मुलीची छेड काढणारा गुंडाविरोधात जी आक्रमक दाखवली ती एक आई म्हणून कौतुकास्पद आहे. कोणत्याही आईने मुलींच्या सुरक्षेची काळजी घेणं हे साहजिकच आहे. गुंडांना धडा शिकविण्यासाठी रक्षाताईंनी ज्या आक्रमकपणे त्यांना पाठीशी घालणारांना खडे बोल सुनावले, आक्रमकता दाखवली त्याबद्दल त्यांच्यातील कणखरता दिसून आली. सगळ्यां मातांनी ही आक्रमकता अनुकरणात आणावी अशी. पालक म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. पोलिसांना ही त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. माध्यमातूनही संतप्त भावना व्यक्त केल्या. रक्षाताईंनी आई म्हणून मुलीसाठी संवेदनशील असणं, अन्यायाच्या विरोधात आक्रमक होणं मनापासून आवडलं. ज्यांच्या घरात मुली आहेत ते सर्वच पालक मुलींवरील वाढत्या अत्याचारच्या बातम्यानी अस्वस्थ आहेत. अशा सर्व पालकांचे मन काल रक्षाताईंच्या आक्रमकतेने जनू जिंकले. 


भाजपा नेत्या, केंद्रीय मंत्री म्हणून रक्षाताई....


दिल्ली विदयापीठ, JNU विद्यापीठ, जामीया मिलिया विद्यापीठात कधी ABVP च्या गुंडानी तर कधी केंद्रीय गृह मंत्र्यांच्या हाताखालील पोलिसांनी शिक्षण घेणाऱ्या मुलींना मारहाण केली, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केलें. बनारस हिंदू विद्यापीठात भाजपाच्या आयटी सेल कार्यकर्त्यांनी मुलीची छेड काढली, विनयभंग केला, अत्याचार केल्यावर खासदार म्हणून, देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून रक्षाताईंनी कधी साधा निषेध नोंदवला ? घेतली त्या मुलींची बाजू ? केली गुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ? 


ऑलिम्पिक स्पर्धेत पदक कमावणाऱ्या मुलींवर शारीरिक अत्याचार झाले, बलात्कारी गुन्हेगारांना संसदेत मानाचं पान मिळालं, न्यायासाठी मुली रस्त्यावर उतरल्यावर पोलिसांकरवी देशाच्या राजधानीत त्यांचा अतोनात छळ झाला. यावेळी रक्षाताईंनी खासदार म्हणून, देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून कधी साधा निषेध नोंदवला ? घेतली त्या मुलींची बाजू ? केली गुंडाचा, बलात्कारी ब्रिजभूषण सिंगचा बंदोबस्त करण्याची मागणी ? 


बिलकीस बानोवर बलात्कार करणारे, तीच्या कुटुंबियांचा खून करणारे गुन्हेगार कोर्टाने दिलेली शिक्षा भोगत असताना भाजपाच्या गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ़ करायची मागणी कोर्टाकडे केली. शिक्षा माफ़ होऊन गुन्हेगार बाहेर आले. त्यानंतर त्याचे सत्कार झाले, स्वागत झालं. करणारे संघ भाजपा समर्थक होते. खासदार म्हणून, देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून रक्षाताईंनी कधी साधा निषेध नोंदवला ? घेतली बिलकीस बानोची बाजू ? केली बलात्कार्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ? 


मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. दररोज बलात्कार करण्यात आले. छोट्या मुली महिलांच्या हत्या झाल्या. आजही मणिपूर जळत आहे. भाजपा सरकार आणि मुख्यमंत्र्यावर आरोप झाले.  खासदार म्हणून, देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून रक्षाताईंनी कधी साधा निषेध नोंदवला ? घेतली मणीपुरी महिलांची बाजू ? केली दंगोलखोरांचा, बलात्कार्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ? 


गौरी लंकेशला मारलं. विनेश फोगाट, प्रियंका गांधी, अतिशी, डिंपल यादव, सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी, जया बच्चन, साक्षी मलिक,्वरा भास्कर, दीपिका पदुकोण,रश्मी ठाकरे, मेधा पाटकर, सुप्रिया श्रीनेत, सोनाक्षी सिन्हा या व अशा लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या, कलाकार, खेळाडू महिलांना अर्वाच्च बोललं गेलं. घाणेरडं ट्रोलिंग केलं गेलं. त्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून फिरवले गेले.  खासदार म्हणून, देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून रक्षाताईंनी कधी साधा निषेध नोंदवला ? घेतली त्या महिला, मुलींची बाजू ? केली ट्रोलर्स, बदनामी करणारांच्या बंदोबस्ताची मागणी ? 


महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, रेल्वेस्टेशन, बस स्थानक, शासकीय कार्यालयात बलात्कार होतं आहेत. पोलिस ठाण्यात गोळ्या झाडून खून होतं आहेत. सरपंच, आमदार सुरक्षित नाहीत. पोलिसी आशीर्वादाने ड्रग्जच्या विळख्या तरुणाईला नासवलं जातंय. पोलिस कोठडीत पोलिसच जीव घेतं आहेत.सरकारी अधिकाऱ्यांवर पिस्तूल रोखलं जातं. कोयता गँग माणसं चिरून टाकतेय. गोरगरिबांच्या गाड्या फोडल्या जातं आहेत. अपहरण, हत्या, दरोडे, फसवणूकीत महाराष्ट्र अव्वल ठरून बदनाम होतोय. महाराष्ट्रातील खासदार म्हणून, देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून रक्षाताईंनी कधी साधा निषेध नोंदवला ? कायदा सुव्यवस्था ढासळतीय म्हणून उठवला आवाज ? 


रक्षाताई तूम्ही "आई" म्हणून काल मन जिंकलत ! 

पण भाजपा पक्ष सदस्य म्हणून, खासदार म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी आहात, देशासह महाराष्ट्रातील बजबजपूरीला तूम्हीही राज्य - केंद्र सरकारइतक्याच जबाबदार आहात. 

तुमच्या मुलीचे छेड काढणारे तुमच्याच पक्षासोबत महाराष्ट्रात सरकारमध्ये असलेल्यांचे शागीर्द निघाले. त्या गुंडासाठी त्यातील काहींनी पोलिसांना धमकावले. सत्तेसाठी महिलां मुलींची छेड काढणारे, खून करणारे, भ्रष्टाचार करणारे, ड्रग्ज माफिया भाजपाने पावन करून घेतले. यातून राज्यात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली. मान्य करा. 

लेकीसाठी पेटून उठणाऱ्या रक्षाताई महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी आणि ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर सरकारला जाब विचारतील तर आम्ही तुमच्यातील आईला आणि नेतृत्वाला डोक्यावर घेऊ !! 


हनुमंत पवार.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.


 
Top