तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
सुरेश हावरे यांनी कै.रिमलिग़प्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय, त्रिविक्रम मंदिर, श्री संत गोरोबा काका मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली.यावेळी तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे, हभप दिपक महाराज खरात, शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, डॉ गुरूप्रसाद चिवटे, नवनाथ पांचाळ, गोरख माळी,राहुल गायकवाड, मयूर तापडे,नरहरी बडवे आदी उपस्थित होते.