उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट कपिलवस्तू बुद्ध विहार कराळी येथे शनिवारी (दि 22)सातव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धम्मपरिषदेत पूर्णा येथिल भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना होणार आहे. परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री संजय बनसोडे,यांच्या हस्ते करण्यात येत आहे अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे,तर स्वागताध्यक्ष दिलीप भालेराव, परिषदेचे संयोजक भदन्त सुमंगल हे आहेत.
या धम्मपरिषदेत पूज्य भन्ते पय्यांनंद थेरो,भन्ते धम्मसार थेरो,भन्ते सुमेध नागसेन,भन्ते कश्यप,भन्ते अमरज्योती यांची धम्म प्रवचने होणार आहेत.
प्रारंभी भिक्षू संघाच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होणार आहे.पाली पूजा झाल्यानंतर भीम बुद्ध गीतांचा जंगी कार्यक्रम होणार आहे. धम्म परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी अमरावतीचें खासदार बळवंत वानखेडे,आमदार डॉ सिद्धार्थ खरात,आमदार राज्यु खरे,कर्नाटकाचे माजी मंत्री सतीश धारकुळी,उद्योगपती पद्मश्री कल्पनाताई सरोज,अनु जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अडँ धर्मपाल मेश्राम,रत्नदीप गायकवाड,डॉ कमलाकर कांबळे, डॉ श्रीकांत गायकवाड,बौद्धांचार्य मिलिंद कांबळे हे करणार आहेत या वेळी रिपाई नेते हरिष डावरे,एस.के.कांबळे(चेले),रामभाऊ गायकवाड,माजी साखर संचालक डी.आय.गायकवाड,माजी अति जिल्हाधिकारी राजकुमार सागर,मनोहर सूर्यवंशी,सिद्धार्थ भालेराव,श्रीमंत सुरवसे,प्रा किरण सगर,उपस्थित आहेत.या परिषदेत मोठया संख्येने बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिल्लारे,उपाध्यक्ष मच्छिंद्र सरपे,सचिव संजीव ओव्हाळ, कोषाध्यक्ष कैलास शिंदे,डी.टी.कांबळे यांनी केले आहे.परिषदेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अनंतकुमार कांबळे,संतोष सुरवसे,राजश्री कदम, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी प्रज्ञाजित आदी परिश्रम घेत आहेत.