धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक वन दिनानिमित्त आज 21 मार्च रोजी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा,वृक्षदिंडी तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.धाराशिव शहरातील भाई उद्धवराव पाटील कन्या प्रशाला येथे वृक्षारोपण करून संपूर्ण शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. 

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर, विभागीय वन अधिकारी बाळकिशोर पोळ,सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी श्री.विश्वास करे,तुळजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच इतर क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानवी आयुष्यात वनांचे महत्त्व स्पष्ट केले.तसेच येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन करून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा संदेश दिला.

 
Top