धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मेघ राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचे सोडवणूक करण्यासाठी तेरणा युथ फाउंडेशन आपल्या दारी उपक्रम सर्वत्र राबवण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये देखील माजी गटनेता तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे आणि युवा नेता सुजित साळुंके यांनी नगरपरिषद शाळा क्रमांक ११ या ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला होता. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, इत्यादी कार्यालयांशी निगडित विविध स्वरूपातील समस्या सांगितल्या असून त्याची सोडवणूक करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अभय इंगळे, राजाभाऊ कारंडे, बंटी मुंडे, समर्थ हाजगुडे, निखिल शेरखाने, प्रथमेश दडपे, राघवेंद्र शेरकर, सौरभ ओवरीकर, बालाजी करपे, श्री शेरकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  तेरणा युथ फाउंडेशनचे शहराध्यक्ष गणेश इंगळगी, उपाध्यक्ष मयूर माळी, आयान काझी, पटेल सर, किरण आवटे, प्रशांत जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top