तुळजापुर (प्रतिनिधी)-   तुळजापूरात अजुनही ड्रग्ज  विक्री सुरू असुन मुख्य आरोपींना ताब्यात घेवुन मकोका खाली कारवाई करावी. असे मागणीचे निवेदन   उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना देण्यात आले.

तुळजापुर शहरात गेली अनेक दिवस ड्रग्ज बाबतीत पोलिस तपास चालु आहे. अनेक आरोपी अटक झालेले आहे. परंतु अश्या परिस्थतीतही तुळजापुर शहरामध्ये आजही खरेदी आणि विक्री होत असल्याचे दिसुन येते. म्हणजेच या धंद्याचा मुळ विक्रेता अजुनही कारवाई पासुन दुर असल्याचे दिसुन येत आहे.

तरी सदरील ड्रग्ज प्रकरणातील चार मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन मकोका कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करून शहर वासियांना दिलासा द्यावा. अन्यथा तुळजापुर शहरवासियांकडून ड्रग्ज प्रकरणी मोठे जन आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिला आहे.

यावेळी अँड. धिरज पाटील, उत्तम अमृतराव, अमोल कुतवळ, शाम पवार, अजय सांळुके, अमरराजे परमेश्वर, नागनाथ भांजी, बापुसाहेब भोसले सह विविध पक्ष, सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top