तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सव - 2025  पुर्व तयारी आढावा बैठक  बुधवार दि. 26 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी पुर्नवसन विभाग अरुणा गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. 

यावेळी विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, पोनि अण्णासाहेब मांजरे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, वैभव पाठक,  मंदीरचे सिध्देश्वर इंतुले, विपीन शिंदे, प्रा धनंजय लोंढे, जगदीश पाटील,  कांबळे सह  विविध खाते प्रमुख उपस्थितीत होते. श्री तुळजाभवानी मंदिर चैत्री पौर्णिमा यात्रा महोत्सव दिनांक 11 एप्रिल 2025 ते दिनांक 15 एप्रिल 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे. सदर यात्रेस येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व यात्रा महोत्सव सुरळीतपणे संपन्न व्हावा. या दृष्टीकोनातून यात्रेच्या पूर्वनियोजना बाबतीत प्रथमता सुचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने सदर चैत्री यात्रा महोत्सव कालावधीत करावयाच्या उपाययोजना बाबतीत सुचना विविध विभागांना देण्यात आली. चैञी पोर्णिमा धार्मिक विधी पुर्वपार परंपरे नुसार करण्याचे ठरले. तसेच याञा काळात घाटशिळ वाहनतळ पायऱ्या पासुन भाविकांना मंदीरात सोडण्यात येणार असुन महाव्दारांमधुन भाविकांना बाहेर सोडण्यात येणार आहे. तसेच याञा काळात मंदीर 22 तास दर्शनार्थ खुले ठेवण्यात येणार आहे. याञा पार्श्वभूमीवर भाविकांचा स्नानासाठी भवानी तिर्थकुंड सुरु करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा, स्वछता, सुरक्षा या बाबतीत विविध उपाययोजना संबंधित विभागाने कराव्यात अशा सुचना यावेळी करण्यात आल्या. सदर पुर्व तयारी आढावा बैठक श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार शनिवारी आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.

 
Top