तेर (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तेर येथील शिवाजीराव नाईकवाडी यांचा सत्कार विजयकुमार लाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हनुमंत कोळपे, सचिन डोंगरे,राहुल गायकवाड, नवनाथ पांचाळ,मतिन मोमीन, तानाजी नाईकवाडी,पोपट पांगरकर,प्रा.दयानंद फंड, प्रविण साळुंके, नवनाथ पसारे, मयूर तापडे, सुनिल गायकवाड, रजनिकांत पेठे,गोरख माळी,अजित कदम, विशाल पांचाळ,नरहरी बडवे उपस्थित होते.