धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट् संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय येथील फार्मसी विभागाच्या वतीने 24 मार्च ते 28 मार्च या दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवा म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमेतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा आठवडा “आरंभ 2025“ म्हणून साजरा करण्यात आला. या फार्मासप्ताहाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या आठवड्यातील कार्यक्रमांचे नियोजन फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती टी. माने यांनी केले होते आणि सर्व कार्यक्रमांचे समन्वयक प्रा. सायली एस. पवार होते. या कार्यक्रमाची सुरुवात इनडोअर गेम्स सुरू करून झाली जिथे विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ आणि कॅरममध्ये भाग घेतला. तसेच पारंपरिक रांगोळी स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा यासारखे इतर उपक्रमही आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयातील सुसज्ज आर्टिफिशियल लॉन्स कोर्ट मध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल असे विविध मैदानी खेळ देखील आयोजित केले गेले होते.सर्व क्रीडा उपक्रमांचे आयोजन प्रा. ए. आय. काझी आणि प्रा. एस. के. सांजेकर यांनी केले होते.फार्मा वीकचा तिसरा दिवस “बॉलवुड डे“ म्हणून साजरा करण्यात आला जिथे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या बॉलवुड अभिनेते आणि अभिनेत्रींप्रमाणे सादरीकरण केले. चौथ्या दिवशी, प्रथम वर्षाच्या आणि तृतीय वर्षाच्या बी साठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. फार्मसीचे विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खेळ आणि अंताक्षरी याचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, गट नृत्य, नाटके आणि पोस्टर संदेशांमध्ये भाग घेतला.
फार्मावीकच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक व बक्षीस वितरण दिनानिमित्त तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त माननीय श्री. बाळासाहेब वाघ साहेब, माननीय अशोक भाऊ शिंदे साहेब विजेंद्र अण्णा चव्हाण साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मागील दोन वर्षापासून तेरणा फार्मसी चे विद्यार्थी जीपॅड व नायपर ह्या परीक्षा उत्तीर्ण होत आहेतच पण ह्यावर्षी फार्मसी विभागातील शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा सुधाकरनाना वाघमारे ह्या मुलीने राष्ट्रीय स्तरावरील फार्मसी शाखेतून गेट 2025 ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे ही मुलगी व आई-वडिलांचा सत्कार करून बक्षीस वितरणाची सुरुवात झाली.
कार्यक्रमातील सर्व विजेत्यांचे बक्षीस वितरण त्याच दिवशी करण्यात आले. तसेच, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आविष्कारच्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर फार्मा वीकमधील सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रस्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी मागील दोन वर्षांपूर्वी फार्मसी ची पहिली बॅच बाहेर पडली आणि पहिल्याच बॅच पासून फार्मसीच्या विद्यार्थ्यांची टीसीएस, गिब्स, विमटा, आय के एस हेल्थ सारख्या व नामांकित लुपिन, रिलायन्स फॉरमा, अपोलो फार्मसी, श्रेया लाईफ सायन्सेस, ई. फार्मसी कंपनीत निवड होण्यास सुरुवात झाली ही आम्हाला अभिमानाची गोष्ट असून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग व फार्मसी हे ह्या हे दोन्ही एकत्रित प्रोग्रॅम असल्यामुळे दोघांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या व उद्योगाच्या चांगल्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी संस्थेची विश्वस्त व माननीय आमदार आदरणीय राणाजगजितसिंहजी पाटील साहेब व संस्थेचे विश्वस्त माननीय मल्हार दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.त्याचबरोबर संस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात ही आमच्यामुळे आदर्श विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तेरणा पब्लिकच्या विश्वस्त आदरणीय अशोक भाऊ शिंदे साहेब यांनी यांच्या भाषणामध्ये मागील आठवड्यात दिनांक 21 व 22 मार्च 2025 रोजी बेंगलोर येथील माजी विद्यार्थी मेळाव्याच्या उल्लेख करून कॉलेज स्थापनेपासून ते आज पर्यंत कॉलेजच्या इतिहास सांगून आम्ही येथे सर्व विद्यार्थ्यांना चांगले चांगले शिक्षण व सुविधा देण्यासाठी सदैवप्रतिशील आहोत असे प्रतिपादन केले.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या शेवटी पहिल्या वर्षासाठी मिस फ्रेशर आणि मिस्टर फ्रेशर म्हणून सुश्री वैष्णवी क्षीरसागर आणि श्री. शुभम राऊत तसेच, थेट दुसऱ्या वर्षाच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांमधून सुश्री विश्वजीता निरगुडे आणि श्री. प्रशांत काळे यांची मिस फ्रेशर आणि मिस्टर फ्रेशर म्हणून नावे घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. फार्म वीक यशस्वी होण्यासाठी सर्व विभागातील प्राध्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. डॉ. जी.बी. चिवटे, डॉ.आर.बी.ननवरे,डॉ. एम.ए.जे. शेख, प्रा.आर. एस. टेकाळे, प्रा. ए.टी. हजगुडे, प्रा. एस.जे. नलगे, डॉ. आर.एस. यादव, प्रा. आर.एस. हिंगमीरे, प्रा.एन.एन. नायकवाडी, प्रा. व्ही.व्ही. इंगळे, प्रा. एस.पी. घनघवे , प्रा. डी.बी. भोजने, श्री. आर.एल. मुंडे व श्री. एच.एम. निंबाळकर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.