धाराशिव (प्रतिनिधी)-.घरामध्ये काही महिलांद्वारे देहविक्री व्यवसाय करवून घेत असल्याच्या आरोपावरून एका महिलेविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 27 फेब्रुवारी दुपारी ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला धाराशिव शहरातील शेकापूर रोड, बालाजीनगर येथे एक महिला घरामध्ये काही महिलांद्वारे देहविक्री व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. पथकाने एका बनावट ग्राहकास पाठवून सदर घरात दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी घरामध्ये एक महिला आढळून आली. महिला पोलिसांमार्फत तिची चौकशी केली असता रत्नमाला सतीश मदने (वय 46 रा. शेकापूर रोड, बालाजीनगर, धाराशिव) ही वाणिज्यक प्रयोजनाकरिता काही महिलांना आश्रय देत त्यांना लैगिंक स्वैराचाराकरिता परावृत्त करीत त्यावर स्वतःची उपजिविका करत आहे असे समजले. यावरून पथकाने रत्नमाला मदने हिच्या ताब्यातून रोख सात हजार 900 रूपये हस्तगत केले व त्या महिलेची सुटका करून रत्नमाला मदने हिच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
सदरची पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन आदेशावरुन मार्गदर्शन केले जाते. अधिकारी विनोद पोलिस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलिस हावलदार विनोद जानराव, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शोभा बांगर, पोलिस अधिकारी अमंलदार बबन जाधवर, जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, विजय घुमे पोलिस अमंलदार दहिंहाडे, धाराशिव शहर पोलिस ठाणे सपोफौ पुरके यांच्या केली.