धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्रमांक 1 पाडोळी (आ) ता. जि. धाराशिव या कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता कार्यक्रम धाराशिव जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष  सुधाकर गुंड (गुरुजी) व रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अजित गुंड पाटील यांच्या हस्ते व उपस्थितीत पार पडला.

सर्वांच्या सहकार्याने आपण या गळीत हंगामाची यशस्वी शेवट करत आहोत. यावर्षी रूपामाता उद्योग समूहाने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यावर्षी आम्ही 2700 रुपये प्रती टन भाव दिला असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर उसबिल मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्यांचे बिलाचे पैसे राहिले असतील ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील. रूपामातावर विश्वास ठेऊन उस देणाऱ्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो. असे अजित गुंड यांनी बोलताना संगितले.

यावेळी कारखान्यावर आलेल्या अखेरच्या ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले व यावेळी हंगामात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ऊस वाहतूकदारांचा, शेतकरी यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सूर्यकांत गरड, चीफ इंजिनिअर संजीव शिलवंत, शेतकी अधिकारी प्रेमनाथ पाटील, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब थोडसरे, विक्री विभागाचे माऊली गुंड, कारखान्यावरील कामगार, सहकारी, ऊस वाहतूक ठेकेदार, उस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top