परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री जयकुमारजी गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे दि.25 फेब्रुवारी रोजी निधन झाले. आज रोजी बोराटवाडी, ता. माण, जि.सातारा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा पदाधिका-यांसह सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी ठाकूर यांच्या समवेत भाजपा परंडा तालुका अध्यक्ष ॲड.गणेशबप्पा खरसडे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, तालुका उपाध्यक्ष बाहासाहेब जाधव, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, भाजपा युवा मोर्चा धाराशिव जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, भाजपा युवा मोर्चा परंडा शहराध्यक्ष अविनाश विधाते आदी होते.